२०
१ तेव्हां परमेश्वराने यहोशवाला असें सांगितलें कीं, २ ''तूं इस्त्राएलाच्या संतानांस याप्रमाणें सांग, 'तुम्ही आपल्यासाठीं आश्रयाचीं नगरें नेमून ठेवा,' जसें म्या मोश्याच्यायोगें तुम्हास सांगितलें होतें तसें; ३ म्हणजे जो चुकून, न जाणतां कोण्या माणसाला हाणितो, त्या हत्या करणा-याने त्यांत पळून जावें; याप्रमाणें तीं नगरें रक्तपाताचा सूड घेणा-यापासून रक्षण होण्यासाठीं तुम्हास व्हावीं. ४ तर त्याने त्यांतल्या एका नगराकडे पळून गेल्यावर नगराच्या वेसीच्या दारासीं उभें राहून आपलें कार्य त्या नगरच्या वड़िलांच्या कानीं सांगावें; मग त्यानी त्याला नगरात आपल्यांजवळ घेऊन त्याला ठिकाण नेमून द्दावें, आणि त्याने त्यांच्याजवळ राहावें. ५ आणि जो रक्तपातामुळें सूड घेतो, तो जेव्हां त्याच्या पाठीस लागतो, तेव्हां त्यानी तो हत्या करणारा त्याच्या स्वाधीन न करावा; कारण कीं त्याने न जाणतां आपल्या शेजा-याला मारिलें, आणि पूर्वकाळापासून त्याचा व्देष केला नाहीं. ६ आणि तो न्यायासांठीं सभेपुढें उभा राही तोंपर्यंत किंवा जो मुख्य याजक त्या दिवसांत असेल त्याच्या मरणापर्यंत त्या नगरांत त्याने राहावे; नंतर त्या हत्या करणा-यांला त्यांत आपल्या घरीं माघारें जावें. ७ यास्तव त्यानी गालीलांत नाफताल्याच्या डोंगरावरलें केदेश, आणि एफ्राइमाच्या डोंगरावरळें शखेम, आणि यहूदाच्या डोंगरावरला किर्याथआर्बा तेंच हेब्रोन, हीं वेगळीं करून ठेविलीं. ८ आणि पूर्वेस यरीहोजवळ यार्देनेच्या पलिकडे रानांतल्या सपाटीवर रऊबेनाच्या वंशांतलें गेजेर, आणि गिलादांत गाद वंशातलें रामोथ, आणि बाशानांत मनाश्श्याच्या वंशांतलें गोलान हीं ठेविलीं. ९ हीं नगरें इस्त्राएलाच्या सर्व संतानांसाठीं, आणि त्यांतला राहणारा जो विदेशी त्यासाठीं असीं नेमलेलीं होतीं कीं जो कोणी चुकून माणसाला मारितो, त्याने त्यांत पळून जावें, आणि तो सभेपुढें उभा राही तोंपर्यंत तेथें राहून जो रक्तपातामुळे सूड घेतो, त्याच्या हाताने त्याने न मरावें.