१६
१ यानंतर शाम्शोन गाजांत गेला. तेव्हां तेथें एक वेश्या पाहून तो तिच्याजवळ गेला. २ आणि शाम्शोन आला आहे असें गाजेकरांस वर्तमान आलें; यास्तव त्यानी चहूंकडे जाऊन सारी रात्र नगरच्या वेसीजवल त्यांच्यासाठी दबा धरिला; आणि ते सारी रत्र स्वस्थ राहत म्हणाले, “सकाळीं उजेड झाला तेव्हां आपण त्याला जिवें मारूं.” ३ आणीत शाम्शोन मध्यरात्रीपर्यंत निजला, मग मध्यरात्रीं त्यांते उठून नगरच्या वेसीचीं कवाडें दोन बायान्सुद्धां व अडसरासुद्धां घरून काढीलीं, मग तीं आपल्या खांद्दांवर घेऊन हेब्रोनाच्यासमोर जो डोंगर त्याच्या शिखरापर्यंत वर नेलीं. ४ आणि त्यानंतर असें झालें कीं त्याला सोरेक ओढ्यावरली एक स्त्री आवडली; तिचें नांव तर द्लीला होतें. ५ यास्तव पलीष्ट्यांच्या अधिकाऱ्यांनी तिच्याजवळ जाऊन तिला म्हटलें, “तूं त्याला फूस लावून त्याचें मोठें बळ कशांत आहे, आणि आम्ही त्याला कशाने बळ चालवून त्याला बांधून स्वाधीन करूं हें पाहा; म्हणजे आम्ही एकएक तुला अकरा अकराशें शेकेल रूपें देऊं.” ६ तेव्हां द्लीला शामशोनाला बोलली, “तुझें मोठें बळ कशांत आहे, आणि तूं कशाने बांधला जाऊन स्वाधीन होसील, हें अगत्य मला सांग.” ७ तेव्हां शाम्शोनाने तिला सांगितले, “जीं ताजीं सात सालपटें सुकलीं नाहींत, त्यांकडून जर ते मला बांधितील, तर मी अशक्त होऊन सामान्य माणसासारिखा होईल.” ८ नंतर पलीष्टांच्या अधिकाऱ्यांनी सात सालपटें जीं सुकलीं नव्हतीं, तीं तिच्याजवळ नेलीं, तिने त्यांकडून त्याला बांधिलें. ९ तेव्हां तिच्याजवळ खोलीत दबधारी बसले होते, आणि तिने त्याला म्हटलें, “हे शाम्शोना, पलिष्टी तुजवर आले आहेत.” तेव्हां जसा तागाचा दोरा अमीला लागतांच तुटून जातो, तसीं तीं सालपटें तुटून गेलीं; असें त्याचे बळ माहित झालें नाहीं. १० नंतर दलीला, शामशोनाला बोलली, “पाहा, त्वां मला फसविलें; मजसीं लबाड्याच केल्या; आतां तूं कशाने बांधला जासील, हें अगत्य मला सांग.” ११ तेव्हां त्याने तिला सांगितलें, “ज्या नव्या दोरानी काम झालें नाहीं, त्यांकडून जर ते मला घट्ट बांधितील, तर मी अशक्त होऊन सामान्य माणसासारिखा होईन.” १२ तेव्हां दलीलेन नवे दोर घेऊन त्यांकडून त्याला बांधिले, आणि त्याला म्हटलें, “हे शामशोना, पलिष्टी सुजवर आले आहेत.” तेव्हां द्बधारी खोलींत बसले होते, त्यांने तर ते दोर सुतासारिखे आपल्या बाहुंतून तोडून टाकिले. १३ मग दलीला शाम्शोनाला बोलली, “एथवर तूं मला फसवीत आणि मजसीं लबाड्या करीत आलास; तूं कशाने बांधला आसील, हें मला सांग.' तेव्हां त्याने तिला सांगितलें, “जर तूं माझ्या डोक्याच्या सात बटा मागासंगतीं विनसील तर मी तसा होईन.” १४ तेव्हां तिने खुंटी मारून त्या बंद केल्या; मग त्याला म्हटलें, “तेव्हां तो आपल्या झोपेंतून जागा होऊन विनायाची खुंटी व माग यांसुद्धा निघाला. १५ नंतर ती त्याला बोलली, “तुझें ह्दय मजवर नसतां, तूं कसें बोलतोस कीं मी तुजवर प्रीती करितों? आतां तीन वेळा त्वा मला फसविलें, आणि आपलें मोठें बळ कशांत आहे हे मला सांगितलें नाहीं.” १६ नंतर जव्हां तिने आपल्या बोलण्यानी त्याला सारा दिवस पेंचाटींत घालून त्याजवळ असी जिकीर केली कीं मरणा एवढा त्याच्या जिवाला त्रास दिल्हा.' तेव्हां असें झालें कीं, १७ त्याने आपलें सर्व मनोगत तिला कळवून म्हटलें, “माझ्या डोक्यावर वस्तरा फिरविला गेला नाही; कां तर मी आपल्या आईच्या पोटीं झाल्यापासून देवाचा नेजेरी आहे; जर माझें मुंडन होईल, तर माझें बळ मजपासून जाईल, आणि मी अशक्त होऊन भलल्या माणसासारिखा होईन.” १८ तेव्हां त्याने तिला आपलें सर्व मनोगत सांगितलें होतें हे द्लीलेने पाहिलें; यास्तव तिने पाठवून पालीष्ट्याच्या अधिकाऱ्यांस बोलावून म्हटलें, “तुम्ही या वेळेस या, कां कीं त्याने आपलें सर्व मनोगत मला सांगितलें आहे.” तेव्हां पलीष्टयांचे अधिकारी तिच्याजवळ गेले, आणि त्यानी आपल्या हातीं रूपें नेलें. १९ मग तिने त्याला आपल्या गुडघ्यांवर निजविलें आणि माणसाला बोलावून त्याच्या डोक्याच्या सात बटा भादरविल्या; असी ती त्याला नम्न करूं लागली, आणि त्याचें बळ त्यांतून गेलें. २० नंतर ती बोलली, “ हे शाम्शोना, पलिष्टी तुजवर आले आहेत.” तेव्हां तो आपल्या झोंपेंतून जागा होऊन म्हणाला, “मी मागल्या वेलोवेळेप्रमाणें बाहेर जाईन आणि सुटेन.” परंतु परमेश्वराने त्याला सोडिलें होते, हें त्याला कळलें नाहीं. २१ पलीष्ट्यानी तर त्याला धरून त्याचे डोळे फोडून टाकिले; नंतर याला खालीं गाजांत नेऊन पितळ्याच्या बेड्यानी बांधिलें; मग तो बन्दिवानाच्या घरीं दळीत असे. २२ तथापि त्याचें मुंडन झाल्यांनतर त्याच्या डोक्याचे केस वाढूं लागले. २३ मग पलिष्ट्यांचे अधिकारी आपला देव दागोन याजवळ मोठा यज्ञ व उत्साह करायास मिळाले; कारण कीं ते म्हणाले, “आमच्या देवाने आमचा शत्रू शाम्शोन आमच्या हातीं दिल्हा आहे.” २४ तेव्हां लोकानी त्याला पाहून आपल्या देवाची स्तुति केली; कां कीं त्यानी असें म्हटलें कीं, “जो आमचा शत्रू आणि आमचा देश ओस करणारा देखील, ज्याने आमच्यांतल्या बहुतांचा प्रतहि केला, त्याला आमच्या देवाने आमच्या हातीं दिल्हें आहे.” २५ आणि जेव्हां त्यांचें अंतःकरण संतुष्ट झालें, तेव्हां त्यांनी सांगितलें, “तुम्ही शाम्शोनाला बोलवा, म्हणजे तो आम्हास हसविल.” तेव्हा त्यानी शाम्शोनाला बंदिवानांच्या घरांतून बोलाविलें, आणि तो त्यांच्यापुढें थट्टेचें पात्र झाला, आणि त्यांनी त्याला खांबांच्यामध्यें उभें केलें होतें. २६ नंतर त्या नव्या तरण्याने त्याला हातीं धरिलें होतें, त्याला शाम्शोन बोलला, “ज्या खांबांचा घराला आधार आहे, ते म्या चांपसावे म्हणून तूं मला त्यांजवळ ने, म्हणजे मी त्यांवर टेंकेन.” २७ तें घर तर पुरुषानी व स्त्रियानी भरलेलें होतें, आणि पलिष्ट्यांचे सर्व अधिकारी तेथें होते; स्त्रियांसुद्धा सुमारें तीन हजार पुरुष धाब्यावरहि शाम्शोनाची थट्टा पाहत होते. २८ तेव्हां शाम्शोनाने परमेश्र्वराला हक मारीत म्हटलें, “हे प्रभू परमेश्र्वरा, कृपेकरून माझी आठवण कर, आणि हे देवा, या वेळेस मात्र कृपेकरून मला बळकट कर; म्हणजे मी आपल्या दोन डोळयांविषयीं पलीष्ट्यांचे एकदम सूड उगवून घेईन.” २९ नंतर ज्या दोन मधला खांबांवर घर राहिलेलें, आणि ज्यांचा आधार पावलेलें होतें, त्यांतला एक शाम्शोनाने आपल्या उजव्या हाताने आणिं दुसरा आपल्या डाव्या हाताने घरीला. ३० तेव्हां शाम्शोन बोलला, “पालिष्ट्यांच्यासंगतीं माझा जीव जावो;” मग तो वळाने लवला, आणि तें घर त्या अधिकाऱ्यांवर व त्यांतल्या सर्व लोकांवर पडलें; असें तो जिवंत असतांना त्याने जे मारिले होते, त्यांपेक्षा आपल्या मरणकाळीं जे मारिले ते अधिक झाले. ३१ नंतर त्याचे भाऊ व त्याच्या बापाच्या घरचे सर्व यांनी खालीं जाऊन त्याला उचललें, आणि त्याला नेऊन जरा व एष्टावोल यांमध्ये त्याचा बाप मानोहा याच्या कबरेंत पुरिलें; त्याने तर वीस वर्षे इस्त्राएलांचा न्याय केला होता.