५
१ बेलशस्सर राजाने आपल्या हजार दरबाऱ्यांना मेजवानी दिली. राजा त्यांच्यासह मद्य पीत होता. २ राजाने मद्य पिता-पिता आपल्या सेवड्ढांना सोन्या चांदीचे प्याले आणण्याचा हुकूम दिला. हे प्याले, त्याचे आजोबा नबुखद्नेस्सर यांनी यरुशलेमच्या मंदिरातून आणले होते. राजघराण्यातील लोकांनी राजाच्या स्त्रियांनी आणि दासींनी त्या प्याल्यांतून मद्य प्यावे अशी राजाची इच्छा होती. ३ म्हणून यरुशललेमच्या देवाच्या मंदिरातून आणलेले सोन्याचे प्याले त्यांनी आणले.राजा, दरबारी, राण्या व दासी हे त्यातून मद्य प्यायले. ४ मद्य पिता-पिता ते त्यांच्या मूर्तिदेवतांची स्तुती करीत होते.ज्या देवतांची ते स्तुती करीत होते ती दैवते म्हणजे सोने, चांदी, कासे, लोखंड, लाकूड व दगड यापासून बनविलेले पुतळे होते. ५ मग अचानक एक मानवी हात भिंतीवर लिहिताना दिसू लागला. भिंतीच्या गिलाव्यावर बोंटांनी शब्द कोरले गेले, राजवाड्याच्या दिवठाणा जवळच्या भिंतीवर हाताने लिहीले जात असताना राजाने पाहिले. ६ बेलशस्सर राजा खूप घाबरला त्याचा चेहरा भीतीने पांढराफटक पडला व त्याचे हातपाय थरथर कापू लागले, पायातला जोर गेल्याने तो उभा राहू शकत नव्हता. ७ राजाने मांत्रिक आणि खास्दी यांना बोलावून घेतले. तो त्या ज्ञानी माणसांना म्हणाला,” हा लेख वाचून जो कोणी त्याचा अर्थ मला सांगेल, त्याला मी बक्षिस देईन. मी त्याला महावस्त्रे देईन,त्याला सोन्याची साखळी देईन. मी त्याला राज्याचा तिसरा महत्वाचा अधिकारी करीन.” ८ मग राजाची सगळी ज्ञानी माणसे आत आली.पण त्यांना लेख वाचता आला नाही. त्याना त्याचा अर्थ कळू शकला नाही. ९ बेलशस्सर राजाचे दरबारी गोंधळून गेले.त्यामुळे राजा फारच घाबरला,तो काळजीत पडला, त्याचा चेहरा भीतीने पांढराफटक पडला. १० तेवढ्यात राजाचा व राजदरबाबाऱ्यांचा आवाज ऐकून राजमाता मेजवानी चालली होती तिथे आली. ती म्हणाली, “राजा, चिरंजीव भव! घाबरू नकोस,भीतीने असा पांढराफटक होऊ नकोस. ११ तुझ्या राज्यात पवित्र दैवतांचा आत्मा ज्याच्यामध्ये वास करतो, असा एक माणूस आहे. तुझ्या वडिलांच्या काळात, ह्या माणसाने त्याला रहस्ये समजतात हे दाखवून दिले होते. तो अतिशय चलाख व सुज्ञ असल्याचे सिध्द झाले होते. ह्या गोष्टींत तो देवतासमान आहे. तुझ्या आजोबांनी, नबुखद्नेस्सर राजाने, त्याला सर्व ज्ञानी माणसांचा प्रमुख म्हणून नेमले होते. मांत्रिकांवर व खास्द्यांवर त्याचा प्रभाव होता. १२ मी ज्या माणसाबद्दल बोलत आहे, त्याचे नाव दानीएल आहे. राजाने त्याला बेलट्शस्सर असे नाव दिले आहे. बेलट्शस्सर (दानीएल) फार चलाख आहे व त्याला अनेक गोष्टी माहीत आहेत, स्वप्नांचा अर्थ सांगण्याची, रहस्ये उलगडण्याची, अवघड प्रश्नांची उत्तरे देण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्याला बोलावून घे, तोच तुला भिंतीवरील लेखाचा अर्थ सांगेल.” १३ मग दानीएलला राजासमोर उभे करण्यात आले. राजा दानीएलला म्हणाला,” तुझे नाव दानीएल आहे का? माझ्या वडिलांनी यहूदातून आणलेल्या कैद्यांपैकी तू एक आहेस का? १४ तुझ्या अंगात देवतांचा आत्मा आहे असे मला कळले आहे. तुला रहस्ये समजतात, तू फार चलाख व फार ज्ञानी आहेस असे मी ऐकले आहे. १५ भिंतीवरचा हा लेख वाचण्यासाठी मांत्रिक व ज्ञानी माणसे येथे आली. मला, त्यांनी ह्या लेखाचा अर्थ स्पष्ट करून सांगावा,अशी माझी अपेक्षा होती. पण त्यांना ते सांगता आले नाही. १६ मी तुझ्याबद्दल ऐकले आहे. तुला गोष्टींचा अर्थ स्पष्ट करता येतो आणि अवघड प्रश्नांची तू उत्तरे शोधू शकतोस असे मला समजले आहे. जर तू भिंतीवरचा लेख वाचून, त्याचा अर्थ मला सांगितलास, तर मी तुला महावस्त्रे देईन, सोन्याची साखळी तुझ्या गव्व्यात घालीन आणि तुला माझ्या राज्यातील प्रमुख पदांपैकी तीन क्रमांकाचे पद देईन. १७ मग दानीएल राजाला म्हणाला “बेलशस्सर राजा तुझी दाने तुलाच लखलाभ हावेत! त्या भेटी पाहिजे तर दुसऱ्या कणला दे.मला काही नको.मात्र भी तूला भिंतीवरचा लेख वाचून अर्थ सांगतो. १८ राजा,परात्पर देवाने, तुझ्या आजोबांना,राजा नबुखद्नेस्सरला खूप मोठा व सामर्थ्यशाली राजा केले. देवाने राजाला खूप महत्व दिले. १९ वेगवेगव्व्या राष्ट्रांतील आणि निरनिराळे भाषा बोलणारे लोक नबुखद्नेस्सरला घाबरत. का? कारण परात्पर देवाने त्याला महान बनविले होते. जर एखाद्याने मरावे असे नबुखद्नेस्सरला वाटले,तर तो त्याला मारे. ह्याउलट एखाद्याने जगावे असे त्याला वाटल्यास तो त्याला जगू देई. त्याच्या इच्छेप्रमाणे तो एखाद्याला महत्व देई, तर एखाद्याला क्षुद्र लेखी. २० पण नबुखद्नेस्सरला गर्व झाला, तो दुराग्रही बनला. म्हणून त्याची सत्ता काढून घेतली गेली. त्याला सिंहासन सोडावे लागले, त्याच्या वैभवाचा लोप झाला. २१ मग त्याला सक्तीने लोकांपासून दूर करण्यात आले.त्याचे हदय पशूप्रमाणे झाले. तो जंगली गाढवांबरोबर राहिला व त्याने गाईप्रमाणे गवत खाल्ले. तो दवात भिजला तो धडा शिकेपयैत त्याला हे भोगावे लागले. मगच त्याला पटले की मनुष्याच्या राज्यावर परात्पर देवाचे प्रभुत्व असते, परात्पर देवाच्या इच्छेप्रमाणे राज्याचा राजा ठरविला जातो. २२ पण बेलशस्सर, तुला हे सर्व ठाऊकच आहे तू नबुखद्नेस्सरचा नातूचआहेस पण अजूनही तू नम्र झाला नाहीस. २३ नाही! तू नम्र झाला नाहीस उलट तू स्वर्गातल्या देवाच्याविरुध्द गेलास. देवाच्या मंदिरातील प्याले आणण्याचा तू हुकूम दिलास. त्या प्याल्यातून तू, तुझे राजदरबारी, तुझ्या स्त्रिया आणि दासी मद्य प्यालात, आणि सोने-चांदी, कासे, लोखंड, लाकूड वा दगड यांच्यापासून बनविलेल्या देवतांची तू स्तुती केलीस. ते खरे देव नाहीत. ते पाहू शकत नाहीत ऐकू शकत नाहीत. त्यांना काही समजत नाही तू, तुझ्या जीवनावर व तू करीत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर ज्या देवाचे प्रभुत्व आहे, त्याचा मान राखला नाहीस. २४ म्हणूनच भिंतीवर ज्याने लिहिले तो हा हात देवाने पाठविला. २५ भिंतीवरचे शब्द पुढीलप्रमाणे आहेत:मेने, मेने, तेकेल, उफारसीन. २६ “ह्या शब्दांचा अर्थ असा: मेने: देवाने तुझ्या राज्याच्या शेवटाचे दिवस मोजलेत. २७ तेकेल: तुला तोलले गेले, तेव्हा तू उणा पडलास २८ उफारसीन: तुझे राज्य तुझ्याकडून काढून घेण्यात येत आहे. त्याचे विभाजन होईल व ते मेदी व पारसी यांच्यात विभागले जाईल.” २९ मग बेलशस्सरने दानीएलला महावस्त्रे देण्याचा हुकूम दिला. त्याने दानीएलला सोन्याची साखळी व राज्यैंतील तिसऱ्या क्रमांकाचे पद दिले. ३० त्याच रात्री, खास्द्यांचा राजा, बेलशस्सर याला ठार मारण्यात आले ३१ आणि दारयावेश नावाचा बासष्ट वर्षे वयाचा मेदी नवा राजा झाला.