७
१ .मग किर्याथ -यारीमाची माणसें आली आणि त्यांनी यहोवाचा कोश नेला, व तो डोंगरावर अबीनादाबाच्या घरांत आणून ठेवला, आणि त्यांनी त्याचा मुलगा एलाजार याला यहोवाचा कोश राखायला पवित्र केलें. २ आणि असें झालें का, कोश किर्याथ-यारीमांत राहिला त्या दिवसापासून बहुत काळ लोटला,म्हणजे वीस वर्षे झाली,आणि इस्त्राएलाच्या सर्व घराण्याला यहोवाची ओढ लागली. ३ मग शमुवेल इस्त्राएलाच्या सर्व घराण्याशी बोलला,तो म्हणाला,जर तुम्ही आपल्या सर्व ह्रदयानें यहोवाकडे फिरतां तर आपणापसून परके देव व एष्टारोथ दूर करा, आणि तुम्ही आपली ह्रदयें यहोवाकडे लावून केवळ त्याचीच सेवा करा, म्हणजे तो तुम्हांस पलिष्याच्या हातातून ,डवील, ४ मग इस्त्राएलाचें संतान बाल व अष्टरोथ दूर करून केवळ यहोवाची सेवा करूं लागलें. ५ आणि शमुवेल बोलला, सर्व इस्त्राएलांस मिस्पा येथें एकवट करा, म्हणजे मी तुम्हासाठी यहोवाला विनंती करीन. ६ मग ते मिस्पात जमले, आणि त्यांनी पाणी काढून यहोवाच्या समोर ओतलें, व त्या दिवशी उपास करून तेथे म्हटले, आम्हीं यहोवाच्या विरूध्द पाप केलें आहे.तेव्हां शमुवेलानें मिस्पात इस्त्राएलाच्या संतानाचा न्याय केला. ७ आणि इस्त्राएलाची संतानें मिस्पांत जमली आहेत असें पलिष्यांनी ऐकलें, तेव्हां पलिष्टयांचे सरदार इस्त्राएलावर चाल करून आले.तेव्हां इस्त्राएलाची संतानें हे ऐकून भ्याली. ८ आणि इसत्राएलाची संतानें शमुवेलाला म्हणाली, यहोवा आमचा देव यानें आम्हास पलिष्टयांच्या हातातून , सोडवावे म्हणून आम्हासाठी त्याच्याकडे आरोळी करण्याचें सोडूं नको. ९ मग शमुवेलानें तान्हे कोकरू घेऊन त्याचा सकल यज्ञ सकल यज्ञ यहोवाला अर्पण केला;आणि शमुवेलाने इस्त्रेळासाछी यहोवाला ओरोळी केली, तेव्हां .यहोवाने त्याला उत्तर दिलें. १० आणि शमुवेल होमार्पण अर्पीत होता तेव्हा पलिष्टी इस्त्राएलाशी लढायला जवळ आले; आणि त्यादिवशी यहोवाने पलिष्ट्यावर विजेच्या मोठ्या कडकडाटानें गर्जना करून त्यांस घाबरे केले व इस्त्राएलापुढें त्यांचा मोड झाला. ११ तेव्हा इस्त्राएलाची माणसें मिस्पातून निघून पलिष्ट्यांच्या पाठीस लागली, आणि बेथ-कारापर्यत त्यांना मारीत गेलीं. १२ मग शमुवेलाने एक दगड घेतला,आणि मिस्पाव शेन याच्यामध्यें तो उभा केला आणि त्याला एबन -एजर(म्हणजे, साहाय्याचा दगड)असें नाव ठेवून म्हटलें,येथपर्यत यहोवानें आमचें साहाय्य केले आहे. १३ असेंपलिष्टी पराभूत झाले, आणि ते इस्त्राएलाच्या सीमेंत आणखी आले नाहीत.आणि शमुवेलाच्या सर्व दिवसात यहोवाचा हात पलिष्ट्यांच्या विरूध्द होता. १४ आणि एक्रोनापासून गथापर्यत जी नगरे पलिष्ट्यांनी इस्त्राएलापासून घेतली होती तीं इस्त्राएलास परत मिळाली;आणि त्याच्या सीमा इस्त्राएलाने पलिष्ट्यांच्या हातातून घेतल्या;आणि इस्त्राएल व अमोरी यांच्यामध्ये शांतता होती. १५ आणि शमुवेलानें आपल्या आयुष्याच्या सर्व दिवसातंत इस्आएलाचा न्याय केला. १६ तो वर्षोवर्षी बेथलास व गिलगालास व मिस्पात अनुक्रमानें जाई, आणि त्या सर्व ठिकाणीं इस्त्राएलाचा न्याय करी. १७ आणि रामा येथें त्याचें परतून येणें होत असे, कारम तेथएं त्याचें घर होते, आमि तेथएं तो इस्त्राएलाला न्याय करीत असे, आणि तेथे त्याने यहोवाला अर्पणे अर्पायला वेदी बांधली.