२३
१ तेव्हां कोणीं दावीदाला सांगितलें कीं, पाहा,पलिष्टी कईल्याशीं लठतात व खळी लुटतात. २ म्हणून दावीदानें यहोवाला विचारलें, तो म्हणाला, मी जाऊन त्या पलिष्ट्यांना मारून कईल्याचें तारण कर. ३ तेव्हां दावीदाच्या माणसांनी म्दटले, पाहा आम्हाला येथें यहूदांत भय आहे, आमि म्ही कईल्यांकडे पलिष्टांच्या सैन्यावर गेलो तर तें किरीतरी अधिक होईल! ४ मग दावीदाने आणकी यहोवाला विचारले, आणि यहोवाने उत्तर देऊन म्हटलें, उठून खाली कईल्याकडे जा,कारण मी पलिष्ट्यांस तुझ्या हाती देईन. ५ मग दावीद व त्याची माणसें कईला येथें जाऊन पलिष्ट्यांशी लझली, आणि त्यांनी त्यांची गुरेढोरें नेली, व मोठ्या वधानें त्यांना मारलें; असें दावीदानें कईलांकरास तारलें. ६ आणि असें झालें कीं, अहीमलेखाचा मुलगा अब्याथार दावीदाकडे कईला येथें पळून ला तेव्हां त्यानें आपल्या हातीं एफोद आणलें. ७ आणि दावीद कईल्याला गेला असें कोणी सांगितलें; तेव्हां शौल म्हणाला, देवाने त्.ला माझ्या हातीं दिलें आहे, कारण वेशीच्या व अडसराच्या नगरात शिरून तो कोंडला गेला आहे. ८ मग कईल्याकडे उतरावें आणि दावीदाला व त्याच्या माणसांना वेढा घालावा म्हणून शौलानें सर्व लोकांना लढाईला बोलावलें. ९ आणि आपल्यावर शौल वाईटयोजीत आहे हें दाविदाला कळलें, म्हणून तोअब्याथार याजकाला म्हणाला, अफोद इकडे आण. १० मग दावीद म्हणाला, हे यहोवा, इस्त्राएलाच्या देवा, शौल माझ्यामुळें नगराचा नाश करायला कईल्यावर येऊ पाहतआहे अमें तुज्या लेवकानें खचित ऐकले आहे; ११ तर कईलावर मला शौलाच्या हातीं देतील काय? तुझ्या सेवकानें ऐकल्याप्रमाणें शौल खालीं येईल काय? हे यहोवा, इस्त्राएलाच्या देवा, मी तुला विनती करतों, हें तूं आपल्या सेवकाला सांग. आणि यहोवा, बोलला, तो खालीं येईल. १२ मग दावीद म्हणाला, कईलावर मला व माझ्या माणसांना शौलाच्या हातीं देतील ? आणि यहोवा बोलला, ते तुला त्याच्या हाती देतील. १३ मग दावीद व त्याची माणसें उठून कईल्यांतून निघून गेली; ती सुमारे सहाशे माणसे होती. आणि त्यांना जेथें जायला मिळालं य्थें ती गेली; तेव्हां दावीद कइल्यातून पळाला असें शौलाला कोणी सांगितलें, आणि त्यानें तिकडे जायचें सोडलें. १४ आणि दावीद रानातील गडांमध्यें राहूं लागला, तो जीफ रानात डोंगराळ प्रदेशांत राहूं लागला.च आमि नित्य त्याचा शोध करीत गेला, परंतु देवानें त्याला त्याच्या हाती दिले नाही. १५ आणि आपला जीव घ्यालला शोल निघाला आहे असें दावीदाने पाहिलें, आणि दावीद जीफ रानातींल एका झाडींत होता; १६ आणि शौलाचा मुलगा योनाथान उठून झाडीत दावीदाकडे गेला, आणि त्याने त्याचा हात देवाच्याठायी सबळ केला; १७ आणि तो त्याला म्हणाला, भिऊ नको, कारण माझा बाप शौल याच्या हाती लागणार नाहींस, तूं तर इस्त्राएलावर राजा होशील, आणि तुझ्याजवळ मीच पहिला होईन, हें माझा बाप शौलहि जाणतो. १८ तेव्हां त्या दोघांनी यहोवाच्यासमोर करार केला.मग दावीद झाडीत राहिला व योनाथान आपल्या घरीं गेला. १९ आणि जीफी लोक शौलाकडे गिबा येथें येऊन म्हणाले, यशीमोनाच्या दक्षिणेकडे, हकीला डोंगरातील झाडींत, गडांमध्यें दावीद आम्हापांशी लपून राहिला आहे की नाही? २० तर आतां हे राजा, खाली येण्याच्या आपल्या सर्व मनोरथप्रमाणें खाली यें, म्हणजे त्याला राजाच्या हातीं देणें हें आमचें काम . २१ तेव्हां शौल म्हणाला, तुम्ही यहोवापासून आशीर्वाद पावलेले व्हा, कारण तुम्हीं माझ्यावर दया केली आहे. २२ मी तुम्हाला विनंती करतो,तुम्ही जा,आणखी मन लावून त्याचे पाऊल उमटण्याचे ठिकाण कोठें आहे आणि तेंथे त्याला कोणीं पाहिले, याची माहिती काढून पाहा, कारण तो फार चतुराईनें वागतो, असें मला शांगितले आहे. २३ तर जेथे तो लपून राहतो त्या सर्व लपण्याच्या जागा पाहून त्यांची खात्री करून घ्या, मग खरें वर्तमान घेऊन माझ्याकडे परत या;मग मी तुम्हाबरोबर जाईन, आणि असे होईल की तो मुलखात असलातर मी त्याला यहूदाच्या सरेव हजारांहून हुडकून काढीन. २४ मग तें उठले, आणि शौलापुढें जीफाकडे गेले; परंतु दावीद व त्याची माणसें यशीमोनाच्या हक्षिणेकडे मावोनाच्या रानांत, अराबात होती. २५ आणि शऔल व त्याची माणसें त्याचा शोध करायला आलीं. हें कोणी दावीदाला सांगितलें म्हणून तो खडकावरून उतरून मावोनाच्या रानांत राहिला, हें ऐकून शौल मावोनाच्या रानांत दावीदाच्यामागें लागला. २६ आणि शौल डोंगराच्या एका सबाजूनें चालला, आणि दावीद व त्याची माणसें डोंगराच्या दुसऱ्या बाजूनें चालली, आणि दावीदानें शौलौपासून पळायला घाई केली, कारण शौल व त्याची माणसें दावीदाला व त्याच्या माँसांना धरायला घेरीत होती. २७ परंतु दूत शौलाकडे येऊन म्हणाला, कवकर ये, कारण पलिष्ट्यांनी देशावर घाला घातला आहे. २८ तेव्हां शौल दावीदाचा पाठलाग सोडून पलिष्ट्यावर चाल करून गेला; याकरितां त्या जागेचे नाव सेला हम्मालकोथ 9 म्हजे,निसटून जाण्याचा खडक) असें पडलें. २९ मग दावीद तेथून वर जाऊन एन गेदीच्यागडांमध्यें राहिला.