2
येशु लखवा व्हयेल माणुसले बरं करस
(मत्तय ९:१-८; लूक ५:१७-२६)
थोडा दिन नंतर येशु कफर्णहुम गावमा परत वना, अनी तो घर शे, हाई लोकसनी ऐकं. तवय त्याना घरमा ईतला लोकसनी गर्दी करी की, दारमाईन घुसाले सुध्दा जागा नव्हती, तठे जमेल लोकसले त्यानी संदेश दिधा. तवय लखवा व्हयेल माणुसले चारजण त्यानाकडे उचलीसन लई वनात. गर्दी इतली व्हयेल व्हती की, त्यानाजोडे जावाले जागाच नव्हती, म्हणीन त्या घरवर चढनात. येशु जठे उभा व्हता तठला कौले त्यासनी काढी लिधात अनी जी खाटवर तो लखवा व्हयेल माणुस झोपेल व्हता त्यासनी ती खाट तठे खाल उतारी दिधी. मी त्याले बरं करसु हाऊ त्यासना ईश्वास दखीसन येशुनी लखवा व्हयेल माणुसले सांगं, “हे पोऱ्या, तुना पापसनी क्षमा व्हयेल शे.”
काही शास्त्री लोके तठे बशेल व्हतात. त्या आपला-आपला मनमा ईचार कराले लागनात की, “हाऊ असा कसा काय बोलस? हाऊ तर देवनी निंदा करी राहीना! कोणीच देवना शिवाय पापनी क्षमा करू शकस नही!”
येशुले त्याना आत्मिक दृष्टीघाई लगेच दखायनं की, शास्त्रीसना मनमा काय ईचार चाली राहिनात. तो त्यासले बोलना, “तुम्हीन आपला मनमा हाऊ ईचार कसाले करी राहिनात? ‘तुना पापनी क्षमा व्हई गई,’ अस लखवा व्हयेल माणुसले बोलानं की, ‘ऊठ, तुनी खाट उचलीन, चालाले लाग’ हाई बोलनं, कोणतं सोपं शे? 10 मनुष्यना पोऱ्याले जगना पापनी क्षमा कराना अधिकार शे,” हाई तुमले समजाले पाहिजे अस बोलीन येशुनी लखवा व्हयेल माणुसले सांगं, 11 “मी तुले सांगस की, ऊठ, तुनी खाट उचलीन घर जाय!”
12 मंग तो ऊठना अनी लगेच त्यानी खाट उचलीन सर्व लोकस समोरतीन गया, हाई दखीन सर्व लोके चमकाई गयात, त्या देवना गौरव करीसन बोलनात, “आम्हीन अस कधीच दखेल नव्हतं!”
लेवी नावना माणुसले पाचारण
(मत्तय ९:९-१३; लूक ५:२७-३२)
13 मंग येशु परत गालील समुद्रना काठवर गया अनी सर्व लोकसनी गर्दी त्यानाजोडे वनी. तवय तो त्यासले शिकाडू लागना. 14 मंग समुद्रना काठवरतीन तो जाई राहिंता, तवय त्यानी अल्फिना पोऱ्या लेवीले जकात नाकावर बशेल दखं, अनी त्याले सांगं, “चल मनामांगे ये,” तवय लेवी ऊठीसन त्यानामांगे गया.
15 मंग येशु लेवीना घर जेवाले गया. तठे येशु अनी त्याना शिष्य यासना पंगतमा बराच जकातदार अनी पापी लोके जेवाले बशेल व्हतात. कारण असा बराच लोके त्याना मांगे येल व्हतात. 16 तवय परूशी पंथमधला शास्त्री लोकसनी दखं की, येशु जकातदार अनं पापी लोकससंगे जेवण करी राहीना, त्या त्याना शिष्यले बोलनात, “हाऊ असा लोकससंगे का बर जेवण करस?”
17 हाई ऐकीसन येशु त्यासले बोलना, “निरोगी माणुसले वैद्यनी गरज ऱ्हास नही, तर आजारी माणुसले ऱ्हास, मी धार्मीक माणससले नही, तर पापी माणससले बोलावाले येल शे.”
उपासबद्दल प्रश्न
(मत्तय ९:१४-१७; लूक ५:३३-३९)
18 बाप्तिस्मा देणारा योहानना शिष्य अनी परूशी ह्या उपास करतस, म्हणीन काही लोके ईसन येशुले ईचारु लागनात, “योहानना शिष्य अनी परुशीसना शिष्य उपास करतस मंग तुमना शिष्य उपास का बर करतस नही?”
19 येशुनी त्यासले सांगं, “जोपावत वऱ्हाडीसनासंगे नवरदेव शे, तोपावत त्या उपाशी राहतीन काय? जोपावत नवरदेव त्यासनासंगे शे तोपावत त्या उपाशी राहूच शकत नही.” 20 पण असा दिन येवाव शे की, नवरदेव त्यासनापाईन येगळा व्हई, तवय त्या उपास करतीन.
21 कोणी नवा कपडाना तुकडा ठिगळं पडेल जुना कपडाले लावस नही, लाव तर ठिगळाकरता लायल कपडा जुना कपडाले अजुन फाडी टाकी अनी ठिगळं अजुन मोठं व्हई जाई. 22 कोणी नवा द्राक्षरस कातडापाईन बनाडेल जुनी थैलीमा भरीन ठेवस नही. जर तसं करं तर थैली फाटी जाई, अनी सर्व द्राक्षरस सांडाई जाई. म्हणीसन नवा द्राक्षरस नवा थैलीमा भरीन ठेवतस.
शब्बाथ दिनबद्दल प्रश्न
(मत्तय १२:१-८; लूक ६:१-५)
23 एकदाव अस व्हयनं की, शब्बाथ दिनले येशु त्याना शिष्यससंगे वावरमाईन जाई राहींता. जाता जाता शिष्य ओंब्या तोडीन खाई राहींतात. 24 हाई दखीसन परूशी येशुले बोलनात, “दख, तुना शिष्य अस कामकरी राहीनात जे शब्बाथ दिनले नियमप्रमाणे करतस नही!”
25 येशुनी त्यासले उत्तर दिधं, “तुम्हीन कधी हाई वाचं नही का? की, जवय दावीद राजा अनी त्यानासंगे ज्या व्हतात, त्यासले भूक लागनी अनं त्यासनाजोडे खावाले काहीच नव्हतं तवय दावीद राजाने काय करं, 26 कशा तो देवना मंदिरमा गया अनी देवले अर्पण करेल भाकरी ज्या याजकशिवाय कोणीच खातस नही. त्या त्यानीपण खाद्यात अनी त्यानासंगे ज्या व्हतात, त्यासले पण खावाड्यात, हाई अब्याथार हाऊ जवय महायाजक व्हता, तवय हाई घडनं की नही?”
27 आखो तो त्यासले बोलना, “शब्बाथ दिन हाऊ माणसंसना चांगला करता बनाडेल शे; माणुस शब्बाथ दिनकरता नही.” 28 यामुये मनुष्यना पोऱ्या शब्बाथ दिनना धनी शे.